Punjab Dakh Andaj: ‘या’ तारखेला पाऊस पुन्हा विश्रांती घेणार, अमावस्याला कसे राहणार महाराष्ट्रातील पाऊस पंजाब डख म्हणतात..?

Punjab Dakh Andaj नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात पावसाची स्थिती पुन्हा एकदा सुधारत आहे आणि आगामी काही दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने 25 तारखेपासून पावसाची तीव्रता वाढणार असा इशारा दिला आहे. पंजाबराव डख यांनीही 27 ऑगस्टपर्यंत पावसाच्या अंदाजाची माहिती दिली आहे.

मित्रांनो गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाची सुरुवात झाली आहे. ऑगस्टच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला होता, पण त्यानंतर पावसात काही काळ विश्रांती होती, ज्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात मोठा पावसाचा खंड पडला होता, यामुळे यावर्षीही अशाच स्थितीचा भय सतावत होता.

Punjab Dakh Andaj 2024

तथापि, सध्या राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झालेला आहे. भारतीय हवामान खात्याने 25 तारखेपासून पावसाची तीव्रता वाढण्याची माहिती दिली आहे. पंजाबराव डख यांनी देखील 27 ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता वर्तवली आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण जास्त राहील, विशेषतः कोकण, अहमदनगर, बीड, वैजापूर, पैठण आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये.

📢 हे पण वाचा :- लाडक्या बहिणीचे नाव रेशन कार्डवर नाही? योजनेच्या लाभापासून राहू नका वंचित, एका क्लिकमध्ये करा नोंदणी !

28 तारखेनंतर, म्हणजेच 28 आणि 29 तारखेला, राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होईल, आणि बैलपोळ्याच्या दिवशी म्हणजेच 2 सप्टेंबरला पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील प्रमुख धरणांमध्ये पाण्याची आवक वाढण्याची आशा आहे.

गेल्या वर्षी एल निनोमुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती, पण यावर्षी एल निनोचा प्रभाव कमी झाल्यामुळे मान्सून कालावधीत चांगला पाऊस होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा चांगले उत्पादन मिळण्याची आशा आहे. शेतकरी मित्रांनो ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा नक्की पाठवा जेणेकरून त्यांनाही हवामान अंदाज माहिती होईल.

📢 हे पण वाचा :- ऐकलं का ? आता RBI बँक देतंय 10 लाख रुपये जिंकण्याची संधी फक्त हे काम करावं लागेल वाचा डिटेल्स !

मित्रांना शेअर करा

Leave a Comment