RBI New Scheme ऐकलं का ? आता RBI बँक देतंय 10 लाख रुपये जिंकण्याची संधी फक्त हे काम करावं लागेल वाचा डिटेल्स !

RBI New Scheme नमस्कार मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आपल्या 90 व्या वर्धापन दिनानिमित्त अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी एक विशेष राष्ट्रीय क्विझ स्पर्धा RBI 90 Quiz सुरू करण्याची घोषणा केली आहे.

ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये बँकेबद्दल आणि फायनान्शिअल इकोसिस्टीमबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी आहे.

स्पर्धा बहुस्तरीय स्वरूपाची असून तिची सुरुवात ऑनलाइन होईल.ऑनलाइन फेरी नंतर, लोकल आणि राज्य स्तरावर स्पर्धा आयोजित केल्या जातील.फायनल राष्ट्रीय पातळीवर होईल, ज्यात राज्यस्तरीय विजेते स्पर्धा करतील.

स्पर्धेत कोण भाग घेऊ शकतो? : कोणत्याही स्ट्रीममध्ये अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना स्पर्धेत भाग घेता येईल.विद्यार्थ्यांचे वय 1 सप्टेंबर 2024 रोजी 25 वर्षांपेक्षा कमी असावे. सहभागी होण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही.

पुरस्कार : राष्ट्रीय पातळीवरील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे 10 लाख रुपये, 8 लाख रुपये आणि 6 लाख रुपयांचे बक्षीस मिळेल.

विभागीय स्तरावर, पहिला पुरस्कार 5 लाख रुपये, दुसरा 4 लाख रुपये, आणि तिसरा 3 लाख रुपयांचा असेल.राज्यस्तरीय विजेत्यांना अनुक्रमे 2 लाख रुपये, दीड लाख रुपये, आणि 1 लाख रुपयांचे बक्षीस मिळेल.

नोंदणी कालावधी : नोंदणी 20 ऑगस्ट 2024 पासून सुरू होईल आणि 17 सप्टेंबर 2024 रोजी समाप्त होईल.ही स्पर्धा विद्यार्थी, विशेषता तरुण पिढीला आर्थिक ज्ञान, जबाबदार आर्थिक व्यवहार, आणि डिजिटल वित्तीय साधनांचा सुरक्षित वापर शिकवण्यासाठी एक उत्तम संधी आहे.

मित्रांना शेअर करा

Leave a Comment